Sane Gurujee
Author of Shyamchi Aai
About the Author
Image credit: By India Post, Government of India - [1], GODL-India, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=74550694
Works by Sane Gurujee
Tagged
Common Knowledge
There is no Common Knowledge data for this author yet. You can help.
Members
Reviews
#१८. श्यामची आई-मातृप्रेमाचे सुक्त
मराठी वाचनविश्वात सानेगुरुजींचं “श्यामची आई” न वाचलेला वाचक विरळाच म्हणावा लागेल.वाचनप्रवासात कधी न् कधी हे पुस्तक वाचलं जातंच.मातृप्रेम,वात्सल्य काय show more असतं व आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत त्याचं महत्त्व गुरुजींनी सुरेख गोष्टींत सांगितलं आहे.
प्रारंभी आईवडिलांचं कर्तव्य अधोरेखित करताना गुरुजी म्हणतात, “मोठेपणाचा अर्थ म्हणजे जगाला मी माहित आहे असा नसुन मी निर्दोष होत आहे,उन्नत होत आहे याची जाणीव असणे हा आहे, ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्त्पन्न करतात.”
“सुर्यचंद्रांना माहित असो वा नसो, त्यांच्या किरणांनी कमळं फुलतात,तसंच आईबाप व इतर लोकांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकळ्या फुलतात हे खरे”. नाशिकमधील तुरुंगात असताना यातील बव्हंशी लिखाण गुरुजींनी केलं.दिवसभर काम व रात्री लिखाण अशा पद्धतीनं त्यांनी पुस्तकाचं बरंचसं काम पुर्ण केलं.आपल्या सहकाऱ्यांच्या विनंतीवरुन, स्वतःच्या पुर्वायुष्याविषयी सांगताना श्याम त्याच्या आईविषयीच्या आठवणींना उजाळा देतो.हे सगळं सांगायचा उद्देश श्यामची प्रौढी मिरवण्याचा नसुन आईची प्रेममय शिकवण सर्वांना कळावी हे आहे,अशी कबुलीही देतो.
लहानग्या श्यामला आईकडून मिळालेली शिकवण लहानसहान प्रसंगांतुन मिळत असली तरी तीच पुढे आपले विचार विकसित होण्यास मदतनीस ठरली हे गुरुजी आवर्जून सांगतात.
स्वावलंबन(पत्रावळी बनवायचा प्रसंग), स्वातंत्र्य,शिस्त,परोपकार(मथुरी),देशभक्ती,निसर्गप्रेम(मुक्या कळ्यांचा प्रसंग) भुतदया(मोरी गाय),माणुसकी,सभाधीटपणा(पंगतीत श्लोक म्हणायचा प्रसंग),खरेपणा(चोरीचा प्रसंग),औदार्य (उदार पितृह्रदय), बंधुप्रेम(कोटाचा प्रसंग),प्रामाणिकपणा(वडिलांना नवं धोतर नेसायचा प्रसंग),स्वाभिमान (स्वतःचं वेगळं खोपट बांधून रहायची आलेली वेळ)सार्थ धर्माभिमान(सावित्री-व्रत) अशा गुणांची शिकवण आईच्या संस्कारातुन त्यांच्यात आपोआप रुजत गेली हे त्यांनी सांगितलेल्या आठवणींतुन कळतं.
”पायाला माती लागेल म्हणून एवढा जपतोस,तसं मनाला घाण लागणार नाही म्हणून जप हो.”या वाक्यात सुसंस्कारांची पाळंमुळं बालमनात खोलवर रुजली जावीत याकरिता केलेले प्रयत्न दिसुन येतात.
“खरा तो एकचि धर्म । जगाला प्रेम अर्पावे” या ओळींतील कविमनाची ऋजुता कशी रुजली असावी याची उकल यातुन होते.
गुरुजींची भाषा समजायला सरळ,सोपी.वेगवेगळे प्रसंग खरोखरच आपल्यासमोर घडताहेत असं वाटत राहतं. कुठं बडेजाव नाही,ओढुनताणुन उपदेश करायचा अट्टाहास नाही.एखाद्या वडिलधारी व्यक्तीनं मित्रत्वाच्या नात्यानं आपल्या सहकाऱ्यांसह हलकेच आपल्याशी हितगुज साधावं इतकं ते साधं,सहज आहे.
आज व्यवहारी वृत्तीमुळं माणसांतील प्रेम उणावतंय.जातीतलं वैर,धर्मातली तेढ माणुसकीची वीण सैल करत आहे.स्वार्थ,लोभ वाढीस लागुन कुकर्म,देशद्रोह घडताहेत तेव्हा परत अशा मुलभूत मुल्यांची जाणीव करुन देण्याची गरज वाटतेय.
मला वाटतं पुस्तकं आपल्याला सतत काहीतरी देत असतात, कधी ज्ञान, कधी माहिती, कधी संस्कार तर कधी विचार.श्यामची आई सारखं लहानसं पुस्तकही मला सकारात्मकता देऊन जातं,साधेपणातलं सौंदर्य मनात ठसवुन जातं आणि मुख्य म्हणजे घराघरात सतत गृहीतकांत गणल्या गेलेल्या“आई”शीच नव्हे,तर व्यापकरुपातल्या”भारतमातेशी”सुद्धा नव्यानं गाठ घालुन देतं.
सर्वांना मातृदिनाच्या सदिच्छा !
~अनिकेत
कालाष्टमी (१०.०५.२६) show less

May 12, 2026Marathi
Lists
Statistics
- Works
- 4
- Members
- 14
- Popularity
- #739,558
- Rating
- 4.4
- Reviews
- 1
- ISBNs
- 4
- Languages
- 1