Mazi Mulukhgiri

by Milind Gunaji

On This Page

Tags

Member Reviews

1 review
#२०. समृद्ध महाराष्ट्राची मुशाफिरीःमाझी मुलुखगिरी

“The world is a book & those who do not travel read only one page”.जग हे एक पुस्तक आहे व ज्यांनी भटकंती केली नाही त्यांनी या पुस्तकाचे एकच पान वाचल्यासारखं आहे.वेगवेगळी ठिकाणं,तिथले लोक,संस्कृती,भाषा,खानपान,राहणीमान,निसर्ग हे सारं बघायचं,अनुभवायचं,समजुन घ्यायचं तर show more भ्रमंतीला पर्याय नाही.पुस्तकातुन मिळणारं शाब्दिक,काल्पनिक सुख वेगळं पण फिरस्तीतल्या आनंदाला प्रत्यक्षाची जोड देऊन मिळणारं प्रतितीचं समाधान निराळं.

महाराष्ट्र डोंगरदऱ्या,सपाट मैदानं,नदी-समुद्र,जलाशयं,किल्ले,लेणी,जंगलं,देवळं व इतिहासाचा समृद्ध वारसा सांगणारी भुमी.

कधी सुर्यास्तासमयी समुद्राची खर्जातील गाज ऐकत मऊ वाळुत पावलं उमटवत प्रेमीयुगुलानं चालावं…कधी एखाद्या उत्तुंग डोंगरकड्यानं खुणावणाऱ्या दुर्गावर चढुन जाण्यास तरुणाईला भुरळ घालावी…कधी एखाद्या शांत राऊळांत घंटानादानं मनीचा भक्तिभाव उमाळुन यावा…कधी कोरीव लेण्या,चित्रांतुन इतिहासात डोकवावं…कधी अफाट जंगलात,मुसळधारेचा गुंजारव ऐकत अरण्यनाद टिपावा…तर कधी गुलाबी थंडीत गरम चहाचे घुटके घेत एखाद्या विस्तीर्ण जलाशयाकाठी निसर्गशोभा निरखावी…

या भूमीत हे सारं आहे.

साहजिकच,हे सगळं वाचकांपर्यंत पद्धतशीर पोचवायचं तर पुस्तकाची तशी योग्य मांडणीदेखील हवी.म्हणून गुणाजींचं मुलुखगिरी घाटमाथा,जलाशय,किल्ले व मंदिरं,जंगलं,लेणी अशा विभागवार लेखातुन उलगडत जातं.यासोबत काही ठिकाणांची रंगीत छायाचित्रं,संक्षिप्त नकाशे यांनी पुस्तकाची उपयोगिता व देखणेपणात भरच घातली आहे.तांत्रिक बाबींमध्ये खोल न शिरता सर्वसाधारण वाचकास गमेल अशा भाषेत हे लेखन आहे.पैकी महाराष्ट्रातले गड-किल्ले,त्यांची पार्श्वभुमी, इतिहास हा एक विस्तृत विषय असल्यानं त्याची इत्थंभूत माहिती याबरोबरीनं गड-किल्ल्यांना वाहिलेल्या स्वतंत्र पुस्तकातुन करुन घेणं अधिक संयुक्तिक ठरेल,असं मला वाटतं.

नेहमीचं लोणावळा-खंडाळा,माथेरान-महाबळेश्वर सोडलं तर मिलिंदजींच्याच शब्दांत“महाराष्ट्राची कुलू मनाली-माळशेज”,”रौद्र कातळ सौंदर्याचे तोरणमाळ”,”विलोभनीय पण उपेक्षित जव्हार,मोखाडा”असे घाटमाथे व त्यांचं हटके सौंदर्य अनुभवायला जायचं तर “मुलुखगिरी”तुन थोडी माहिती मिळवता येईल.

या राकट…कणखर…दगडांच्या देशांत अनेक निसर्ग-निर्मित तलाव,धरणांमुळे तयार झालेली विस्तीर्ण जलाशय आहेत,सह्याद्रीच्या कडेकपारीतुन कोसळणारे धबधबेही आहेत.पर्यटनाच्या दृष्टिने हे एक वेगळंच दालन मिलिंदजींनी आपल्यापुढे उघडलंय.उन्हेरेच्या गरम पाण्याच्या झऱ्यांपासुन उल्काघातानं तयार झालेला लोणार सरोवराचा परिसर…निघोजच्या निसर्गनिर्मित रांजणकुंडांपासुन ते मिनी काश्मीर “तापोळा तलाव”, कास तलाव,”पाचुच्या कोंदणातलं पेल्हार जलाशय”अशा मानव-निर्मित धरणातून तयार झालेल्या जलाशयांचाही विस्तीर्ण धांडोळा यात घेतला आहे.पुणेकरांची ऊठबस असलेला पावसाळी सौंदर्याचा हमखास अनुभव देणाऱ्या मुळशी तलावास कंटाळला असाल तर “हिरव्याकंच परिसरातील नाढाळ तलाव”, मुंबईच्या उत्तरेकडील सुर्या-वैतरणेच्या खोऱ्यातील बऱ्याच अनवट ठिकाणांविषयी आपल्याला वाचायला मिळेल.

कोकणात कर्नाळ्यापासुन ते पार विदर्भातील नवेगावपर्यंतच्या अभयारण्यांची माहिती,लेण्यांवरचे पुरक लेखही पुस्तकाच्या शेवटी आपल्याला वाचायला मिळतात.

थोडक्यात काय तर,महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातील काही अनवट वाटा धुंडाळायला मुलुखगिरी हाताशी येईल.ज्ञात,सवयीच्या,गर्दीच्या स्थळांना पर्याय म्हणून काही नवीन ठिकाणांचा विचार करता येईल किंवा माहितीतल्या स्थानांविषयी काही अपरिचित तपशील कळतील व त्यांचा नव्यानं धांडोळा घेता येईल.अगदी कुटुंबापासुन एकलकोंड्या उत्साही भटक्यांपर्यंत साऱ्यांना खुणावतील अशा जागांविषयी माहिती यातुन मिळेल.वाचता-वाचता मनांत भेट द्यायच्या स्थळांची यादी,आडाखे तयार झाले नाहीत तरच नवल !

मग…वेळ काढताय न “मुलुखगिरी”साठी?

~ अनिकेत
दुर्गाष्टमी (२३.०५.२६)
show less

Members

Recently Added By

Lists

Author Information

Picture of author.
3 Works 10 Members

Statistics

Members
2
Popularity
6,013,140
Reviews
1