Kolhyatyache por
by Kishor Shantabai Kale
On This Page
Member Reviews
#२१. संघर्ष व जिद्दीची अनोखी गाथा-कोल्हाट्याचं पोर
एखादं पुस्तक वाचायला सुरु केलं की शेवटपर्यत ते खाली ठेववत नाही.उत्कंठेपोटी पानं भराभर मागं पडत जातात नि कधी ओठावर हसु तर कधी डोळ्यांत आसु आणत गोष्ट पुढं सरकत राहते.जे आपल्या नेहमीच्या बघण्या-वाचण्यात नसतं असा एखादा विषय,त्याचं show more अप्रूप,लक्षवेधी मांडणी सारं मन गुंतवून ठेवतं.पहिल्यांदा वाचलं होतं तेव्हाही हीच भावना होती.आता अधिक दृढ झाली.
कोल्हाटी समाजाचं जगणं,नाचणारणीचं आयुष्य,तिला सोसावं लागणारं दुःख, वेदना,अपमान,स्वार्थापायी आपल्याच लोकांनी केलेली फरफट,तिच्या पोराबाळांनी सोसलेला त्रास या साऱ्याचा कळस प्रस्तुत पुस्तकात वाचता येतो.पानापानांत दिसुन येणारी माय-लेकाची कुतरओढ अंगावर काटा आणणारी आहे.सहनशीलतेच्या बाबतीत भारतीय स्त्री चा हात कुणी पकडू शकणार नाही.अन्यायाविरुद्ध कितीही बंडाळी केली तरी जिथं आपलंच शेत कुंपण खातंय तिथं हार पत्करुन मुकाट सोसणं-भोगणं हेच नशिबी आहे.
या समाजात स्त्री ला मिळणाऱ्या वागणूकीविषयी वाचुन मन खंतावतं.
“नाचरणीच्या मुलापुढे आईचं नाव लावलं जातं,कारण बापाचा पत्ता नसतो….”“नाचणारणीनं प्रेम करु नये,संसार करु नये,स्वतःच्या मुलांसाठी जगू नये?तिचं जीवन फक्त आईतखाऊ बाप,भावासाठी असतं का? कोल्हाटी समाजात सुंदर मुलीनं जन्म घेणं म्हणजे पाप !”
“एक बाप आपल्या मुलीच्या मनाशी खेळत होता,तिला जिवंत जाळल्यासारखं करीत होता,पैशाच्या लालचीनं व आयतं खाण्याच्या सवयीनं कोंडिबा आजोबानं बाप-मुलीच्या नात्याला फाशी दिलं.”
”जर एखाद्या मुलीला कोणी शिटी वाजवत असेल तर त्या मुलीचा भाऊ त्या शिटी मारणाऱ्यावर नक्कीच चिडेल,पण नाचणारणीचे भाऊ बघा ! शिटीवाला जर धनिक असेल तर त्याला गादीवर बसवून त्याचे हात-पाय दाबायची त्यांची तयारी असते.हे कुठलं भावा-बहिणीचं नातं?”
लहानग्या“किसऱ्या”चं आईविना बालपण,आईची ओढ,शिक्षणासाठी केलेली धडपड,लहान वयांत खाल्लेला मार,खस्ता वाचुन मन हेलावतं.अगतिक होऊन आईनं दुर केलेल्या किसऱ्याच्या वाट्याला प्रेम,माया मिळायच्या वयात अवहेलना व हेटाळणीच येते.
”ठेवलंन आईनं आमच्या उरावर”.”कुणाचं हाळजलंय कुणाला माहित,भिकाऱ्याचं रुप घेऊन?त्याच्याकडून पैसे घेतोस?”इ. वाचुन त्याच्या नातलगांची प्रचंड चीड येते व छोट्या किसऱ्याची कीव.
पुर्ण पुस्तकभर काही व्यक्तींविषयी प्रचंड घृणा मनात दाटून येते.ही माणसंच ना?इतपत शंका येईल असं त्यांच्या वागण्या-बोलण्यातुन जाणवतं राहतं.
कॅालेजच्या दिवसांत लेखकानं लाजेस्तव आपली ओळख लपवायला केलेला खटाटोप,पैशाची जुळवाजुळव करताना केलेल्या तडजोडी वाचुन हळवं व्हायला होतं.मित्रांसोबतचे काही अनुभव,समाजात लोककलावंतांचा अनादर,चारित्र्याविषयीच्या गैरसमजुती,त्यांना मिळणाऱी हीन वागणूक आणि त्या तुलनेत फिल्मी कलावॅतांना मिळणारा पैसा,सन्मान हा विरोधाभास प्रकर्षानं जाणवतो.सिनेमात काम करणाऱ्या नटींना आपलं अंगप्रदर्शन करावं लागतं,कितीतरी नायकांबरोबर काम करावं लागतं.ते बघणाऱ्याच्या डोळ्यांना न खुपता फॅशन म्हणून सहज खपतं.इथं अंगभर नऊवारी नेसून प्रामाणिकपणे नाचुन घाम गाळला तरी लोक वाईट नजरेनं बघतात.
या साऱ्या दुर्दैवी प्रवासात मदतीचा हात देणाऱ्या नागीणमावशी,लोणीकर,मधुमावशींबाबत किशोरजी आवर्जून लिहितात.या लघुकादंबरीचा हवा तसा गोड पण आकस्मिक वाटणारा शेवट वाचुन किशोरजींविषयीचा आपल्या मनातील आदर दुणावल्याशिवाय राहत नाही.
~अनिकेत
कमला एकादशी (२७.०५.२६) show less

May 30, 2026Marathi
Ratings
Members
- Recently Added By
Lists
मराठी पुस्तकं (Marathi Books)
493 works; 1 member
Author Information
Statistics
- Members
- 2
- Popularity
- 8,796,229
- Reviews
- 1
- Rating
- (4.00)
- ASINs
- 1