Gondan (Marathi)
by Shanta Shelke
On This Page
Tags
Member Reviews
आज खुप दिवसांनी मराठी पुस्तक हातात घेतलं आणि तेही शांताबाईंचा कवितासंग्रह !
काही कविता मनावर गारुड करतात तर काही कायमचं "गोंदण"!
काही खास प्रयत्न न करता त्या कविता लक्षात राहतात, दहावीच्या पुस्तकातली "पैठणी" त्यापैकीच एक अगदी प्रत्येक ओळ भावुक करणारी... असं म्हणतात माणुस भुतकाळात रमतो show more ते इथे फक्कड लागु होतं.आजीची पैठणी, तिचा मऊ, उबदार स्पर्श आणि अनंत आठवणी... हि कविता वाचल्यावर हमखास जाग्या होतात.
कधी काही गोष्टींना आपण गृहीत धरतो आणि कधी काही नात्यांना...
"देवपाट" अशीच एक जुनी गोष्ट... तसा फारसा विचार करायला न लागणारी पण त्यालाही शांताबाईंनी भावनांच्या धाग्यात गुंडाळलंय...
"आजोबा" हि अजुन एक कविता, तिचा शेवट तर केवळ भन्नाट.. "मातीला ओढ मातीची... "
स्री भावना निसर्गाच्या वेगवेगळ्या रुपातुन प्रतिबिंबित करणाऱ्या तर बऱ्याच कविता आहेत...
काहीत घुसमट, काहींमधे स्त्रीमनाचे सहज चित्रण निसर्गातल्याच एखाद्या साध्या घडामोडीतुन बेमालुम मिसळलंय
लहानपणीच्या थोड्या आठवणींना उजाळा द्यायला आणि एका सिद्धहस्त कवयित्रींच्या कवितांचा आनंद लुटायला हे पुस्तक वाचलंच पाहिजे..
फक्त "पैठणी" साठी ५ स्टार्स... तुम्हाला काय वाटतं? show less

Dec 24, 2025Marathi
Members
- Recently Added By
Lists
मराठी पुस्तकं (Marathi Books)
492 works; 1 member
Author Information
Statistics
- Members
- 1
- Popularity
- 8,776,589
- Reviews
- 1
- Rating
- (5.00)
- Media
- Ebook
- ASINs
- 1